MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकालाला अवघे तास शिल्लक, येथे पाहा निकाल

MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकालाला अवघे तास शिल्लक, येथे पाहा निकाल

Published by :
Published on

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विटव्दारे माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी 7. 00 नंतर उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले जातील. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com