Hingoli Earthquake : हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; तीव्रता 3.5 रिश्टर स्केल

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Hingoli Earthquake) हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी 5 वाजून 55 मिनिटाला हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे.

3.5 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद करण्यात आली असून वसमतसह कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावासह 10 ते 12 गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावं भूकंपाचे केंद्रबिंदू होते. या भूकंपाच्या धक्कामुळे गावात भितीचे वातावरण आहे.

Summery

  • हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के

  • सकाळी 5 वाजून 55 मिनिटाला भूकंपाचे सौम्य धक्के

  • 3.5 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com