एमआयएमच्या आघाडीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे म्हणाले…
एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Zalil) यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एक नवा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शनिवारपासून या आघाडीबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी या आघाडीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी आघाडीच्या मुद्यावर भाष्य केले. एमआयएम (MIM) सोबत आघाडी कदापी झोपेतही शक्य नाही. एमआयएम (MIM) भाजपकडून आली आहे, एमआयएम (MIM) भाजपची टीम असल्याचे ठाकरे यांनी म्हणत, औरंगजेबच्या थडग्यावर डोक ठेवणाऱ्यांसोबत मावळा जाणार नाही,असे उत्तर देत, जलील यांची ऑफर धुडकारली. तसेच पुढे म्हणाले, आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे असंही स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा असं आवाहन केलं.
"शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा". तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, "मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत"असेही ते म्हणाले.