Wadada BJP
Wadada BJP

Wadala BJP : वडाळ्यातील वॉर्ड क्र.200मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली; भाजपचे उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Wadada BJP) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

तसेच उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत कोणी राजीनामा दिला तर कोणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली.काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर आता वडाळ्यातील वॉर्ड क्र.200मध्ये भाजपची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम असून मंत्री आशिष शेलार व मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काल रात्री त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर ही धुमाळेंकडून उमेदवारी मागे घेण्यास नकार देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे पीए संदीप पानसांडे यांना उमेदवारी दिल्याने बंडखोरी केली गेली.

Summary

  • वडाळ्यातील वॉर्ड क्र.200मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली

  • भाजपचे उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम

  • मंत्री आशिष शेलार आणि अमित साटम यांनी काल घेतली भेट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com