Chandrashekhar Bawankule : मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंच्या सभेवर टीका, म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chandrashekhar Bawankule) ठाकरे बंधूंची काल संयुक्त सभा पार पडली. या सभेमधून ठाकरे बंधूंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. या सभेवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करुन मतदानाच्या प्रक्रियेमध्ये विकासाच्या अजेंडा बाजूला करायचा. राज साहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो ते चुकता आहेत. त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकते आहे."
"प्रचाराचा फोकस चुकतो आहे. त्यांची पार्टी किंचित किंचित होत चालली आहे. त्याचे कारण असे आहे, प्रचाराची दिशा चुकतेय आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे." असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Summary
ठाकरे बंधूंचा फोकस चुकतोय- बावनकुळे
मंत्री बावनकुळेंची ठाकरे बंधूंच्या सभेवर टीका
'भावनिक बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करतात'
