मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पोट निवडणूकीचा प्रचार; कोरोना नियमांचा फज्जा…

मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पोट निवडणूकीचा प्रचार; कोरोना नियमांचा फज्जा…

Published by :
Published on

संजय देसाई, सांगली | सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील निवडणुकीसाठी मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कोरोना नियमांची खुलेआमपणे पायमल्लीचा प्रकार घडला आहे.सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत मंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये प्रचार सभा पार पडली.त्यामुळे सामान्यांना वेगळा न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सांगली महापालिका प्रभाग 16 साठी पोटनिवडणूक पार पडत आहे. याठिकाणी काँग्रेसकडून टॉपिक शिकलगार स्वर्गीय माजी महापौर हरून शिकलगार यांचे पुत्र आहेत. ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या प्रचारासाठी खणभाग येथील एका हॉलमध्ये राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.मात्र या सभेत जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा सगळ्यांना विसर पडला. जवळपास 200 हुन अधिक लोक छोट्या हॉलमध्ये दाटीवाटीने बसून होते. तर प्रवेशद्वारावर ही प्रंचड गर्दी होती. असंख्य महिलांनी मास्क न घालता दुपट्टा लावला होता, तर कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळले नव्हते. कोरोना नियमांचे खुलेआमपणे पायमल्ली या ठिकाणी पाहायला मिळाली,आता मंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचा फज्जा उडाला असताना प्रशासना सभा आयोजकांवर कारवाई करणार हा का प्रश्न नागरिकांच्या मधून उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com