पंढरपुरात १२ वर्षांच्या मुलीला झाला मुलगा… अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल!

पंढरपुरात १२ वर्षांच्या मुलीला झाला मुलगा… अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल!

Published by :
Published on

पंढरपूर शहरातील एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने शनिवारी बालकाला जन्म दिला आहे. परंतु या बालकाचा पिता कोण, हे देखील त्या अल्पवयीन मुलीला माहिती नाही. यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या मुलीस तपासून सात महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीचे वय खूप कमी असल्याचे सांगून डॉक्टरांनी सिजर पद्धतीद्वारे मुलीची प्रसूती केली. या मुलीने दीड किलो वजनाचे अर्भक जन्माला घातलंय. यामुळे मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com