amaravati
amaravati team lokshahi

धक्कादायक! कुपोषित चिमुकल्यांना कुशीत घेत दोन बाळंतिणींची पायपीट...

अचलपूर रुग्णालयाने टाकले वाऱ्यावर, रूग्णवाहिका नाकारलीचा आरोप
Published by  :
Team Lokshahi

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील भुत्रुम व कुही येथील आठ दिवसाच्या बाळंतिणीची व्यथा सुन्न करणारी आहे. आपल्या कुपोषित नवजात मुलींना कुशीत घेऊन गावी पायपीट करत दोघी निघाल्या होत्या, अनारकली कासदेकर व लक्ष्मी तांडेकर अशी बाळंतिणीची नावे आहेत. बाळांचे वजन कमी असल्याने त्यांना उपचारासाठी अचलपूर रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांना सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे घरी जाण्यासाठी त्यांनी रूग्णवाहिकेची मागणी केली मात्र रुग्णवाहिका मिळाली नसल्याने चक्क पायीच दोघी बाळाला घेऊन निघाल्या होत्या.

चिखलदरा स्टॉप वर हा प्रकार लक्षात आल्या नंतर लोकप्रतिनिधीनी त्यांना घरी सुखरूप रूग्णवाहिकेने पाठवले. या सर्व प्रकारामुळे अचलपूर रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला. त्यामुळे यावर कारवाईची मागणी केली जात आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com