Kishor Jorgewar
महाराष्ट्र
Kishor Jorgewar : भाजप आमदार किशोर जोरगेवारांना मोठा धक्का; निवडणूक प्रमुख पदावरून हटवले
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kishor Jorgewar) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच भाजपने मोठा निर्णय घेतला असून भाजप आमदार किशोर जोरगेवारांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना थेट निवडणूकप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी फेरनियुक्त्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्याजागी आता माजी खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
भाजप आमदार जोरगेवारांना मोठा धक्का
निवडणूक प्रमुख पदावरून हटवले
माजी खासदार अजय संचेतीकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी
