Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचा राडा; निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला फटकावलं

आमदार निवासमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Sanjay Gaikwad ) आमदार निवासमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातल्याचे पाहायला मिळत आहे. संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संजय गायकवाड आमदार निवास कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत.

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जेवण देण्यात आलं मात्र जेवणात देण्यात आलेला डाळ आणि भात खराब असून त्याचा वास येत असल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला.

निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खराब आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले असल्याचे पाहायला मिळत असून आमदार निवास कँटिनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com