महाराष्ट्र
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची आज शिवतिर्थावर बैठक
राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत मनसेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १२ च्या दरम्यान ही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदी वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसंच, राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना त्यांच्या विभागातील अहवाल तयार करावा असे आदेश दिले होत. यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.