MNS : मनसे नेते राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची घेणार भेट; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट घेऊन देणार निषेध पत्र
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(MNS) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेते राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट घेऊन निषेध पत्र देणार आहेत.
अविनाश जाधव, संदीप देशपांडे दुपारी 12.30 वाजता ही भेट घेणार असून बिनविरोध उमेदवार निवडून आणताना सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Summary
मनसे नेते राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार
अविनाश जाधव, संदीप देशपांडे दुपारी 12.30 वाजता भेट घेणार
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट घेऊन निषेध पत्र देणार
