Breaking News
Breaking News

Breaking News : उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Breaking News) उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. उरण मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि भाजपा उमेदवारा विरोधात व्हिडिओ बनवला म्हणून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला त्याच्या आईसमोरच मारहाण केली असून घरी जात असताना रस्त्यात अडवून मनसे पदाधिकारी सतीश पाटील याला मारहाण करण्यात आली. निवडणुकीनंतर जीवे मारण्याची धमकी देत आमदार महेश बालदी यांची माफी मागणारा व्हिडिओ बनविण्यास देखील त्याला भाग पाडले.

सतीश पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Summery

  • उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

  • भाजप उमेदवाराविरोधात व्हिडिओ बवनल्याने मारहाण

  • निवडणुकीनंतर जीवे मारण्याची धमकी देत मारहाण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com