‘तुम्ही काळजी घ्या, फेरीवाल्यांचं आम्ही बघतो’; राज ठाकरे कल्पिता पिंपळेंच्या भेटीला

‘तुम्ही काळजी घ्या, फेरीवाल्यांचं आम्ही बघतो’; राज ठाकरे कल्पिता पिंपळेंच्या भेटीला

Published by :
Published on

दोन दिवसापूर्वी ठाण्यातील महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे या फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्या. त्या हल्ल्यात कल्पिता यांची दोन बोट बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

राज ठाकरेंचा फेरीवाल्यांना इशारा
ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला होता. "ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत." असं राज ठाकरे म्हणाले.

काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान 30 ऑगस्ट रोजी अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com