Raj Thackeray
महाराष्ट्र
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मिरा रोडमध्ये सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका दुकानदाराला मारहाण केली होती.
(Raj Thackeray) मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका दुकानदाराला मारहाण केली होती. यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. यात जय मारवाडी, जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
या घटनेमुळे चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरुन मिरा रोडमध्ये 8 जुलैला मोर्चा काढण्यात आला होता. मनसे, ठाकरे गट आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने हा मोर्चा काढला होता.आंदोलनादरम्यान मनसैनिकांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली होती.
त्यानंतर आज अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मिरा रोडच्या दौऱ्यावर असणार आहेत.राज ठाकरे यांची शांति गार्डनमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे. या सभेतून राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.