Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. ठाण्यातील उत्तर सभेमध्ये तलवार उंचावल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 7 ते 8 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याच्या सुनावणीसाठी आज गुरुवारी (11 डिसेंबर) राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे हेदेखील आहेत. राज ठाकरे यांची एप्रिल २०२२ मध्ये ठाण्यात 'उत्तर सभा' घेतली होती.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील चौकात पार पडलेल्या या उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना ही तलवार भेट दिली होती.

Summery

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार

  • एका सभेदरम्यान तलवार उंचावल्यानं दाखल गुन्ह्याप्रकरणी ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार

  • 7 ते 8 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com