नगरविकास विभागाच्या मनमानीमुळे निवडणुका लांबतायत!, मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

नगरविकास विभागाच्या मनमानीमुळे निवडणुका लांबतायत!, मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

मयुरेश जाधव, अंबरनाथ : नगरविकास विभागाने ठरवलं, तर पालिकांच्या निवडणुका लगेच होऊ शकतात, मात्र त्यांच्या मनमानीमुळेच निवडणुका लांबल्या असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केलाय. राजू पाटील हे अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी हा आरोप केला.

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनामुळे निवडणुका न होऊ शकल्यानं गेल्या दीड वर्षांपासून दोन्ही पालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. दरम्यानच्या काळात राज्यात, देशात अनेक निवडणुका, पोटनिवडणुका होऊन गेल्या. बंगालसारख्या मोठ्या राज्यात विधानसभा निवडणुकाही झाल्या. तर नुकतीच पंढरपूर, मग देगलूरची पोटनिवडणूक राज्यात झाली. या सगळ्या निवडणुका होऊ शकतात, तर मग अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या निवडणुका का होत नाही? असा प्रश्न अंबरनाथ आणि बदलापूरकरांना पडला आहे.

याचबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांना विचारलं असता, या नगरपालिकांचा कारभार नगरविकास खात्याकडे आहे, आणि प्रशासकाच्या माध्यमातून हवं ते काम करता येतं, असा बोध आणि शोध नगरविकास खात्याला लागला आहे. त्यामुळे आपली मनमानी करण्यासाठी निवडणुका लांबवल्या जात असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला. तसंच ठरवलं तर निवडणुका लगेच घेऊ शकता असंही ते म्हणाले. एकीकडे पोटनिवडणूक, राजकीय मेळावे होत असताना नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? असा सवालही राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com