MNS : राज ठाकरे यांच्याबद्दल रिक्षाचालकाकडून अर्वाच्य भाषा, मनसे कार्यकर्त्यांनी शिकवला धडा, Video Viral

मराठी-परप्रांतीय वाद पुन्हा उफाळला, मनसे स्टाइलने रिक्षाचालकाला माफी मागण्यास भाग पाडले
Published by :
Shamal Sawant

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठी आणि परप्रांतीय असा वाद समोर आला आहे. मुलुंड परिसरात रिक्षा चालवणाऱ्या परप्रांतीय रिक्षा चालकाने मराठी प्रवाशासोबत हुज्जत घातली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अर्वाच्य शब्ददेखील वापरले. त्यामुळे उद्धट भाषेत बोलल्यामुळे मराठी प्रवाशाने मनसे कार्यालयात तक्रार केली आणि मनसैनिकांनी मनसे स्टाइलने रिक्षा चालकाला धडा शिकवला आहे.

मराठी व्यक्तिच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि त्याच्या कांशीलात लगावत माफी मागण्यास सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर असे पुन्हा करणार नसल्याचे रिक्षावाल्याने कबूल केले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com