MNS Raj Thackeray : मनसेचा आज रंगशारदा सभागृहात मेळावा; 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून मतदार यादीतील घोटाळ्याचं होणार प्रेझेंटेशन
थोडक्यात
मनसेकडून आज मतदार यादीतील घोटाळ्याचं होणार प्रेझेंटेशन
मनसेचा रंगशारदा सभागृहात मेळावा होणार
राज ठाकरेंकडून 'लाव रे तो व्हिडीओ' लावण्यात येणार
(MNS Raj Thackeray) मनसेकडून आज मतदार यादीतील घोटाळ्याचं प्रेझेंटेशन होणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसेचा रंगशारदा सभागृहात मेळावा होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेनंतर मनसेकडूनही मतदार यादी घोळाबाबत प्रेझेंटेशन देण्यात येणार आहे.
आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंकडून 'लाव रे तो व्हिडीओ' लावण्यात येणार असून या बैठकीला राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता रंगशारदा सभागृहात याचे आयोजन करण्यात आले असून राज ठाकरे मतदार यादितीतील त्रुटी समोर आणणार आहेत.
राज ठाकरे मतदार यादीतील गोंधळ, बोगस नावे, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यांवर सविस्तर सादरीकरण करणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे या मेळाव्यातून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
