MNS
MNS

MNS : 24 तासात मनसे मुंबईतील उमेदवारांना AB फॉर्म देणार

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(MNS) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

यासाठी आता राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर 24 तासात मनसे मुंबईतील उमेदवारांना AB फॉर्म देणार आहेत. पहिल्या 50 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात येणार असून बंडखोरी होणार नाही अशा ठिकाणी उमेदवारांना अर्ज देण्यात येणार आहे.

संभाव्य उमेदवारांना कागदपत्रांसह तयार राहण्याचा निरोप देण्यात आला आहे. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म देण्याची शेवटची वेळ आहे.

Summery

  • 24 तासात मनसे मुंबईतील उमेदवारांना AB फॉर्म देणार

  • पहिल्या 50 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात येणार

  • बंडखोरी होणार नाही अशा ठिकाणी उमेदवारांना अर्ज देणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com