MNS
MNS

MNS : नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता मनसे करणार आंदोलन

नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता मनसे आंदोलन करणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(MNS) नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता मनसे आंदोलन करणार आहे. नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे.

यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवनातल्या १८०० झाडांची कत्तल प्रकरणी जाहीर निषेध करण्यात येणार आहे. हा निषेध नोंदविण्या साठी सर्व कलाकार सहभागी होणार असून, वृक्षप्रेमी-नाशिककर तुम्ही देखील सहभागी व्हा असे आव्हान मनसेकडून करण्यात आले आहे.

तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड येथे शनिवारी ६ डिसेंबर ला सकाळी ९.३० वाजता हा निषेध नोंदविण्यात येणार असून यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या सोबत शालिनी ठाकरे आणि शशांक नागवेकर यांची उपस्थिती असणार आहे.

Summery

  • नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता मनसे करणार आंदोलन

  • वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे

  • राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com