7th pay comission | केंद्राकडून कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’
भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. मात्र, निर्णय कधी होणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर केंद्र सरकारने यासंबंधी निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
११ टक्क्यांनी वाढ झाल्याने महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला. यामुळे महागाई भत्त्यातील ४ टक्के वाढ केंद्राने जुलै २०२१ पर्यंत रोखली होती.