मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केले, अण्णा हजारे म्हणाले…

मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केले, अण्णा हजारे म्हणाले…

Published by :

संतोष आवारे, अहमदनगर | गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारने तीन कृषी कायदे संमत केल्याच्या विरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना समोर झुकत सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया येत असून यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घोषित केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी हा देशातील शेतकऱ्यांच्या एकत्रित आंदोलनाचा विजय आहे, हे यश विरोधी पक्षाचे नसून केवळ संघटितपणे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे असल्याचं अण्णांनी नमूद केले. 

कृषी मालाला भाव हा खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी होती. मात्र या कायद्यामुळे हे मागणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे शेतकरी नाराज होता आणि आंदोलन करत होता. केवळ पंजाब, हरियाणा नव्हे तर देशातील अनेक राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेला होता. त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहे ही चांगली गोष्ट आहे. याबद्दल मी समाधानी असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळाल्यास त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार नाही. आता झालेल्या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत. शेतकऱ्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असं अण्णांनी म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com