महाराष्ट्र
मनमाड शहर व परिसरात पावसाची जोरदार हजेरी
मनमाड शहर व परिसरात पावसाने आज दमदार हजेरी लावली. काल सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र आज दुपारी पावसाचा जोर वाढल्याने मनमाड शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले.
या पावसामुळे काही वेळ जनजीवन देखील विस्कळीत झाले होते.. गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.