मान्सून 24 तासांत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता

मान्सून 24 तासांत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मान्सून 24 तासांत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात शनिवारपासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून पुढे सरकरण्यासाठी अनुकूल हवामान आहे.

राज्याच्या अनेक भागात पूर्व मौसमी पावसानं जोरदार हजेरी लावली. मान्सून लवकरच पुढे सरकेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. कोल्हापूर, पुणे, कोकणसह मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com