Monsoon
Monsoon

Monsoon : शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाने केलं शेतकऱ्यांना आवाहन

(Monsoon) गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Monsoon) गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाल्यानंतर आता राज्यात देखील मान्सूनचे आगमन झालं आहे. अनेक ठिकाणी राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणीची घाई करु नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ होईल, तसेत 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यासोबतच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com