Congress : भाजपा काँग्रेसला देणार मोठा धक्का; 10हून अधिक नगरसेवक करणार भाजपात प्रवेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Congress) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे.
यातच आता भाजपा काँग्रेसला मोठा धक्का देणार असल्याची माहिती मिळत आहे. 10हून अधिक नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून नवी मुंबई या ठिकाणी थोड्याच वेळात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
भाजपा काँग्रेसला देणार मोठा धक्का
काँग्रेसचे १०हून अधिक नगरसेवक करणार भाजपात प्रवेश
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
