Nagpur BJP : भाजपाला बालेकिल्ल्यातच खिंडार; नागपूरात 40हुन अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur BJP) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
उमेदवारी देण्यात आली नसल्याने काही जणांनी नाराज होते राजीनामे देखील दिलेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरात 40हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळत आहे. भाजपने उमेदवारी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म चे वाटप केले ज्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यातील काहींनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले तर अनेकांनी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
यामध्ये माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी राजीनामा दिला आहे. प्रभाग 14 मधून माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांना उमेदवारी न दिल्याने भाजपच्या 42 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तर प्रभाग 16 चे पदाधिकारी गजानन निशीतकर यांनी बाहेरचा उमेदवार दिल्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच प्रभाग 27 मधून भाजपचे माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार तर प्रभाग 33 मधून गोलू बोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार
नागपुरात 40 हुन अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
भाजपातही उमेदवारीवरुन प्रचंड नाराजी
