Pune Accident: मोठी बातमी! पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक

Pune Accident: मोठी बातमी! पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक

पुणे अपघात प्रकरणी आणखी एक नुकतीच मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे अपघात प्रकरणी आणखी एक नुकतीच मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. शिवानी अग्रवालला आता पुणे गुन्हे शाखेने आता अटक केली आहे. तर ब्लड सॅम्पलमधील फेरफार प्रकरणी सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलाच्या आईला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉय आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी आरोपीच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune Accident: मोठी बातमी! पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक
Lok Sabha Election Exit Poll Result 2024: लोकसभा निवडणूक 2024 एक्झिट पोल निकाल कधी आणि कुठे पाहाल?

दरम्यान, ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने चक्क खासगी व्यक्तींकडून अदलाबदल करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. तसेच ते नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याचेही सांगितलं जात होतं. याचाच सविस्तर तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com