पुणे मार्केट यार्डात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

पुणे मार्केट यार्डात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

पुणे मार्केट यार्डात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे मार्केट यार्डात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. प्रतवारी आणि काटामारीविरोधात आलं उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आलं उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.

आल्याचा पुणे, मुंबईसाठी पुरवठा थांबवण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इशारा देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आले उत्पादक शेतकरी ठीकठिकाणी आंदोलन करत सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

सरकारनं घोषणा केल्यानंतर सरसकट आलं खरेदी होत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com