महाराष्ट्र
जन आशीर्वाद यात्रा | “केंद्रात काम करतानाही नाशिकवर विशेष लक्ष्य असेल”
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी जनसंवाद साधला. केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला.
राज्याच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी तुमची मुलगी म्हणून मी नक्कीच काम करीन, असे त्या म्हणाल्या. हे काम करताना नाशिक जिल्ह्यावर माझे विशेष लक्ष राहणार असल्याचे माझे प्रयत्न राहील, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती पवार यांनी चांदवड येथील जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी केले.
मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व नाशिक जिल्ह्याची जनता माझ्या डोळ्यासमोर होती असे भावनिक उद्गार देखील त्यांनी यावेळी काढले.