“जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेची भीती” – राऊत
भाजपची जनआशीर्वाद यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. शिवसेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीतही जनआशीर्वाद यात्रा दाखल होतेय. यात्रेमुळे नारायण राणे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करत आहेत. या जन आशिर्वाद यात्रेचा समाचार खासदार विनायक राऊत यांनी घेतलाय.
जन आशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाला निमंत्रण आहे. जन आशीर्वाद यात्रा मुळे नारायण राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येतात आणि कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करतात अशी भीती खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलीय.
दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – राऊत
रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना करताना पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी या दोघांनाही बैल म्हटलंय. यावरून पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलंय. भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.