महाराष्ट्र
2 जानेवारीची MPSC ची परीक्षा पुढे ढकलली
अमोल धर्माधिकारी | महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात आली आहे. 2 जानेवारीला एमपीएससीची ही परीक्षा होणार होती. मात्र काही कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्याने काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडल्याने संधी हुकली होती. त्यामुळे अशा उमेदवारांना परीक्षेस संधी देण्यासाठी 2 जानेवारी 2022 परीक्षा होणार होती. मात्र काही कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून याबाबत माहिती दिली.

