MPSC Exam
MPSC Exam

MPSC Exam: MPSC परीक्षा युक्त पूर्व गट ‘ब’परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी, वेळापत्रकात बदल होणार का?

Vote Counting Day: एमपीएससी संयुक्त पूर्व गट ‘ब’ परीक्षा आणि नगरपरिषद-नगरपंचायत मतमोजणी एकाच दिवशी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ‘ब’ (अराजपत्रित) परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित केली आहे. मात्र, याच दिवशी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याने परीक्षार्थींमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकाच दिवशी दोन महत्त्वाचे शासकीय उपक्रम राबवावे लागणार असल्याने परीक्षा केंद्रांची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.​

MPSC Exam
Mission 2026: बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लॅन तयार

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात व्यस्त राहणार आहेत. यामुळे एमपीएससी परीक्षेच्या व्यवस्थापनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः सातारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या १५ जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र असल्याने तेथील प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या जिल्ह्यांतील तालुका केंद्रांमध्येही परीक्षा केंद्र आहेत. तेथील प्रशासनही मतमोजणीसाठी व्यस्त राहणार आहे.​

MPSC Exam
Sunil Prabhu: "बॉम्बे हायकोर्ट"चे नामकरण "मुंबई उच्च न्यायालय"करावे, आमदार सुनील प्रभू यांची मागणी

एमपीएससी परीक्षांच्या वेळेत बदल आणि त्यांच्या पुढे ढकलण्याची गेल्या काही वर्षांपासून चाललेली प्रक्रिया लक्षात घेता, यंदाही परीक्षा होणार की पुढे जाणार याबद्दल अजूनही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. लाखो परीक्षार्थी आता आयोगाकडून लवकरात लवकर निर्णय जाहीर करण्याची अपेक्षा करत आहेत.

परीक्षेमार्फत भरण्यात येणारी पदे

  • सहायक कक्ष अधिकारी – ०३ पदे

  • राज्य कर निरीक्षक – २७९ पदे

  • पोलीस उपनिरीक्षक – ३९२ पदे

  • २१ डिसेंबरला एमपीएससी गट ‘ब’ परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी नियोजित.

  • जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता.

  • १५ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे असल्याने व्यवस्थापनात अडचणी.

  • अधिकृत निर्णय अद्याप न आल्याने लाखो परीक्षार्थी प्रतीक्षेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com