महाराष्ट्र
MPSC | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की, आज सकाळी त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच पेपर फोडला आहे, या घटनेनंतर अभाविपचे कार्यकर्ते आंदोलनावर बसले आहेत. संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
परीक्षा केंद्रावर पेपर आणले त्यावेळेस पेपरची सील फुटलेली होती. परीक्षा सुरू होण्याआधी नमुना दाखल एका विद्यार्थ्यांची सही घेऊन सील फोडली जाते. पण असे काही झालेच नाही असा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे.
राज्यात आज एमपीएससीचा पेपर झाला. काही समाजमाध्यमांमध्ये पेपर फुटल्याची बातमी येत आहे. परंतु, अशाप्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे स्पष्टीकरण एमपीएससीच्या ट्विटर अकावउंटमधून देण्यात आलंय.

