Light Bill Hike : ऐन दिवाळीतच सर्वसामान्य नागरिकांना बसणार वीज दरवाढीचा शॉक
थोडक्यात
दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक
प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार
महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क
(Light Bill Hike) दिवाळीच्या आधीच नागरिकांना महागाईचा शॉक बसणार आहे. महावितरणने वीज दरवाढ जाहीर केली असून 1 ऑक्टोबर रोजी महावितरण विभागाने एक परिपत्रक जारी केले होते.
सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत.ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचा चांगलाच फटका आता ग्राहकांना बसणार आहे.
1 ते 100 युनिट वापरावर प्रति युनिट 35 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. ऐन दिवाळीतच सर्वसामान्य नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार असून आता या वीज दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे.