मुलुंडचे फोर्टिस हॉस्पिटल 19 हृदयविकारग्रस्त मुलांना देणार जीवनदान
मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील पेडिएट्रिक कार्डियक स्पेशालिस्टस मालेगावमधील 19 मुलांवर जीवनदायी हृदय शस्त्रक्रिया करणार आहेत.नुकतेच पेडिएट्रिक कार्डियक ओपीडीमध्ये त्वरित उपचाराची गरज असलेल्या या मुलांना सहभागी करून घेण्यात आले आहे. लवकरच या मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात येणार आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामीण भागातील मुलांच्या हृदयाच्या आजारांवर उपचार करण्याचा हा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने मालेगावमध्ये जात लहान मुला-मुलींची तपासणी केली. ज्या बाळांना धाप लागणे, वजन न वाढणे, आईच दुध पिताना थांबत थांबत पिणे अशी सर्व त्रास होत आहे, अशा तब्बल 90 बाळांचा एको कार्डीग्राम करण्यात आले. यामधील ह्रद्यात छिद्र, ह्रद्याच्या कप्प्याची आकार लहाण होणे, ह्रद्यातून निघणार्या रक्तवाहिनीच कनेक्शन चूकीचे असणे, अशा आजाराने त्रस्त असलेल्या 19 मुला-मुलींना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. आता या मुलांवर फोर्टिस हॉस्पिटलचे पेडिएट्रिक कार्डियक स्पेशालिस्टस डॉक्टर दुरबीण पद्धतीने किंवा सर्जरी पद्धतीने उपचार करणार असल्याची माहिती डॉ. स्वाती गरेकर यांनी दिली. यामुळे 19 मुलांवर जीवनदायी हृदय शस्त्रक्रिया होणार असून त्यांना जीवनदान मिळणार आहे.