Mumbai Election Holiday
MUMBAI AND 29 MUNICIPALITIES OBSERVE PUBLIC HOLIDAY ON 15 JANUARY 2026 FOR CIVIC ELECTIONS

Mumbai Election Holiday: मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी; शासनाने जारी केली अधिकृत अधिसूचना

Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा तिसरा व अंतिम टप्पा सुरू असून, बडे नेते मैदानात उतरले आहेत. गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राज्य सरकारने मतदानाच्या दिवशी सर्वत्र सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईसह राज्यातील सर्व २९ महापालिका क्षेत्रांमध्ये ही सुट्टी लागू होईल, ज्यामुळे कर्मचारी, कामगार आणि मतदारांना मतदानासाठी सोयीचा वेळ मिळेल.

निवडणूक आयोगाने ईव्हीएमसह प्रशासकीय तयारी पूर्ण केली असून, राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, बँका आणि केंद्र सरकारची कार्यालये बंद राहतील. ही सुट्टी मतदारसंघाबाहेर काम करणाऱ्या मतदारांना देखील लागू आहे. अधिसूचना सर्व विभागांना पाठवण्यात आली असून, मतदानाच्या दिवशी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com