Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : 'या' तारखेदरम्यान मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

30हून अधिक देशांचे अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञांचा असणार समावेश
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • 17 ते 19 फेब्रुवारी 2026 ला मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  • 30हून अधिक देशांचे अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञांचा असणार समावेश

(Devendra Fadnavis) 'मुंबई क्लायमेट विक' ही जागतिक स्तरावरील परिषद मुंबईत होणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ही परिषद मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली असल्याची माहिती मिळत आहे. 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून यावेळी मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी उपस्थित होते.

30हून अधिक देशांचे अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञांचा यामध्ये समावेश असणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फेब्रुवारी 2026मध्ये होणार्‍या या 'मुंबई क्लायमेट वीक'ची घोषणा व लोगोचे अनावरण करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com