Mumbai Garbage Breaking News
Mumbai Garbage Breaking News

Mumbai Garbage Breaking News : देवनारच्या डंम्पिंग ग्राऊंडमध्ये दडलंय काय? कचऱ्याची सद्यस्थिती दाखवण्याकरिता गेलेल्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीला नशेखोरांनी रोखलं

मागील अनेक दिवसांपासून लोकशाही मराठी वृत्तवाहिनी स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई असे अभियान राबवत असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील विषय सातत्याने मांडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Garbage Breaking News ) मागील अनेक दिवसांपासून लोकशाही मराठी वृत्तवाहिनी स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई असे अभियान राबवत असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील विषय सातत्याने मांडत आहे. याच संदर्भात काल देवनार डम्पिंग ग्राउंडजवळ अतिशय खराब अवस्थेतील कचरा गाडी आढळून आली.

लोकशाही मराठीने वांद्रे आणि देवनार ड्रम्पिंग ग्राऊंडवर वार्तांकन केलं. वांद्रे डम्पिंग ग्राउंडजवळ अतिशय खराब अवस्थेतील कचरा गाडी आढळून आली. सूत्रांच्या माहितीनुसार ही गाडी सध्या वापरात नसतानाही अनेकदा फेऱ्यांमध्ये या गाडीचा नंबर कागदावर दाखवून पैसे घेतले जातात,

दरम्यान लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी देवनार डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यासंदर्भात वार्तांकन करत असताना तेथे त्यांची अडवणूक करण्यात आली. यासंदर्भात लोकशाही मराठीने सवाल उपस्थित केले आहेत ,की त्या कचऱ्याच्यामागे असं काय लपलंय ? ज्यामुळे लोकशाहीच्या प्रतिनिधीला वार्तांकनापासून अडवण्यात आलं?

अडवणूक करणारे नेमके कोण?

गर्दुल्ले की त्याच कचरा गाडीवर काम करणारे कॉन्ट्रॅक्टर?

आधी एका माणसाने अडवणूक केली आणि बघता बघता तिथे त्यांचा जमाव जमायला सुरुवात झाली

या जमावाने लोकशाही मराठी वृत्तवाहिनीची अडवणूक करत वार्तांकन करण्यास विरोध केला

या सर्व प्रकारामुळे त्या कचऱ्याच्या गाडीत नेमकं दडलय काय असा सवाल निर्माण होत आहे

लोकशाही मराठी वृत्तवाहिनीची अडवणूक का केली जात आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा

Summery

  • देवनार ड्रम्पिंग ग्राऊंडवर वार्तांकनापासून रोखलं

  • लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीला रोखलं

  • कचऱ्यामागे ड्रग्जचा व्यवसाय ?

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com