महाराष्ट्र
फिल्मसिटीमध्ये आगीचे तांडव, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
ही आग सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबईमधील आरे कॉलनीमधील फिल्मसिटीजवळील झोपड्यांना आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आग सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विजवण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, फिल्मसिटी गेट ते आरे कॉलनी या रस्त्यावरील गोदामाला आणि घरांना आग लागली आहे. या आगीमध्ये 24 पेक्षा अधिक झोपड्यांना आग लागून जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये अद्याप जीवित हानी झाल्याचे कोणतेही वृत्त हाती आले नाही.