किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स; अनिल परबांनी दाखल केला मानहानीचा दावा

किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स; अनिल परबांनी दाखल केला मानहानीचा दावा

Published by :
Published on

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, ७२ तासानंतरही किरीट सोमय्यांकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स बजावण्यात आला आहे. यावेळी 23 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com