MLA Residence canteen : आमदार निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित; अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई
(MLA Residence canteen ) आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवासातील कँटिनमधील एक व्हिडिओ काल समोर आला. ज्यामध्ये संजय गायकवाड आमदार निवास कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसले. यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जेवण देण्यात आलं मात्र जेवणात देण्यात आलेला डाळ आणि भात खराब असून त्याचा वास येत असल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला.
आमदार संजय गायकवाड यांनी ज्या आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली होती, तिथे अन्न आणि औषध प्रशासन एफडीएचं पथक दाखल झालं होते. त्या अधिकाऱ्यांकडून सर्व गोष्टींची तपासणी करण्यात आली. कॅन्टीनमधील पदार्थाची एफडीएने तपासणी केली.
आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.