Mumbai local Megablock: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
लोकलने प्रवास करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल नियोजित थांब्यांवर थांबतील. तर, ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मुलुंड - माटुंगादरम्यान नियोजित थांब्यांवर लोकल थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी - पनवेलदरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे - पनवेलदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही.
पश्चिम रेल्वे
कुठे : जोगेश्वरी - कांदिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवर
कधी : सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनसवरून निघणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस अंधेरी - बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.