Shiv Sena Manifesto : मुंबई महानगरपालिका निवडणूक; शिवसेनेकडून लवकरच 'वचननामा' जाहीर होणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Shiv Sena Manifesto ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात येत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून लवकरच 'वचननामा' जाहीर केला जाणार आहे. या वचननाम्यात शासनाकडून मंजूर करून घेतलेल्या विकासकामांसह नव्या योजनांची घोषणा करणारा हा 'वचननामा' असणार असल्याची माहिती मिळत आहे.
स्वच्छ सुंदर आणि नियोजित शहर बनविण्याच्या हेतूने हा 'वचननामा' बनवण्यात आला असल्याची माहिती मिळत असून हा 'वचननामा' तयार करताना सर्वच वयोगटातील नागरिकांचा विचार करून त्याची आखणी करण्यात आली असून हा 'वचननामा' लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित जाहीर केला जाणार आहे.
Summary
मुंबई महानगरपालिका निवडणूक
शिवसेनेकडून लवकरच 'वचननामा' जाहीर होणार
वचननाम्यात विकासकामांसह नव्या योजनांची घोषणा करणार
