गणेश मंडळांना मुंबई महापालिकेचा दिलासा; जाहिरात शुल्क माफ अन्...नवी नियमावली जाहीर

गणेश मंडळांना मुंबई महापालिकेचा दिलासा; जाहिरात शुल्क माफ अन्...नवी नियमावली जाहीर

कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार

मुंबई : मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे निर्बंध असल्याने राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्यात आला आहे. मात्र, यावर्षी कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय जाहीर केला असून याच्या अंमलबजावणीसाठी आता मुंबई महापालिकेनेही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई पालिकेने आता नव्याने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांना आकारण्यात येणारी सर्व शुल्के माफ करण्यात आली आहेत. तसेच आधी भरलेल्या शुल्काचा परतावाही केला जाणार आहे. मूर्तिकारांनाही दिलासा देताना त्यांच्या मंडपांना लागू असलेले शुल्कही माफ करण्यात आले आहे. त्याचबरोबर मूर्तीची मर्यादाही हटवण्यात आली आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षे गणेशोत्सवावर करोना व टाळेबंदीचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सवासह सर्वच सणांवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मूर्तीची उंची, कार्यकर्त्यांची संख्या इत्यादी निर्बंधांमुळे अनेक मंडळांनी दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. यंदा करोना व टाळेबंदीचे सावट नसल्यामुळे करोनापूर्व काळाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com