Nilesh Rane: मुंबई महापालिका निवडणूक; २२७ प्रभागांसाठी २५१६ उमेदवार, ठाकरे बालेकिल्ल्यात निलेश राणेंची एंट्री
महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता सर्वांचे डोळे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निकालावर केंद्रित झाले आहेत. कोणत्या पक्षाचा झेंडा मुंबईवर फडकवणार याकडे मुंबईकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना अनेक ठिकाणी गोंधळ उडाला असून, एकूण २५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अशातच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंची धमाकेदार एंट्री होणार आहे. तळकोकणासह वरळी, शिवडी, लालबाग, माहीम यांसारख्या महत्त्वाच्या भागांची धुरा निलेश राणेंच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, पुढील १५ दिवस ते या भागांत धडाडणार आहेत. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी निलेश राणे स्वतः मैदानात उतरत असल्याने ठाकरे गटाला मोठा बूस्ट मिळेल, अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असल्याने निकालांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.