मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात: 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, 10-12 जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात: 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, 10-12 जखमी

मुंबई नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू तर10-12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

भिवंडीजवळील पडघा गावाजवळ हा अपघात झाला आहे. वेगवान बस बोगद्याला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असून या खाजगी बस मध्ये 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालक अतीवेगात असल्याने बसचा टर्न बसला नाही आणि बस बोगद्याला धडकली असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com