Mumbai Water Cut
Mumbai Water CutMumbai Water Cut

Mumbai Water Cut : मुंबईत 'या' परिसरात पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन

मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात काही काळ पाणीपुरवठा होणार नाही.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Mumbai Water Shortage: मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात काही काळ पाणीपुरवठा होणार नाही. जलवाहिनीचे मार्गांतर करण्याचे काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांनी आधीच आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

के पूर्व विभागातील बामणवाडा आणि विलेपार्ले पूर्व भागात मेट्रो मार्ग 7-अ च्या कामासाठी मोठ्या क्षमतेच्या ऊर्ध्व वैतरणा जलवाहिनीत बदल करण्याचे काम सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी आल्याने हे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. आता मंगळवार दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा अंदाज आहे. तोपर्यंत पवई उच्च जलाशय क्रमांक 1 मधून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

या भागांमध्ये पाणी येणार नाही...

• ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (औद्योगिक भाग), सहार गाव, सुतार पाखाडी

(साधारण पाणीपुरवठा वेळ : पहाटे 5 ते सकाळी 8.15)

• मुलगाव डोंगरी, एमआयडीसी रोड क्रमांक 1 ते 23, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज

(साधारण पाणीपुरवठा वेळ : सकाळी 11 ते दुपारी 2)

• कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, पी अँड टी कॉलनी

(साधारण पाणीपुरवठा वेळ : दुपारी 2 ते सायंकाळी 5.30)

• चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी 1 व 2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहतीचा काही भाग, चरत सिंग वसाहतीचा काही भाग, मुकुंद रुग्णालय परिसर, औद्योगिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ रस्ता परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोल औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे.बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर

(साधारण पाणीपुरवठा वेळ : दुपारी 2 ते सायंकाळी 5.30)

पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार असल्याने संबंधित भागातील नागरिकांनी खबरदारी म्हणून पाण्याचा साठा करून ठेवावा. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com