Jayashree Patil
Jayashree Patil

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण; सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना दिलासा

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratn Sadavarte) न्यायालयीन कोठडीत आहेत. तर त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील (Jayashree Patil) यांना देखील अटक होण्याची शक्यता होती, मात्र त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना (Mumbai Police) निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे.

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात सदावर्तेंच्या पत्नी डॉ. अ्ॅड जयश्री पाटील (Jayashree Patil) यांची मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. अप्पर सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या समोर दाखल अटकपूर्व जामिनासाठी अर्जावर तातडीची सुनावणी झाली.

यावेळी जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्या अटकपूर्व जामिनाची प्रत गावदेवी पोलिसांना मिळाली नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला होता. तसेच आरोपीला कोणताही दिलासा देऊ नये.प्रकरण गंभीर आहे.तपास सुरू आहे.दिलासा दिल्यास पुरव्याशी आरोपी छेडछाड करण्याची शक्यता असल्याचे सरकारी वकिलांनी जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्या जामीनाला विरोध करताना म्हटले होते.

जयश्री पाटील (Jayashree Patil) यांना मुंबई सत्र न्यायाल्याचा मोठा दिलासा आहे. 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com